नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (UP) राज्यातील मुख्यमंत्र्यांनी (CM) शेतकऱ्यांना (Farmer) एक भेट दिली आहे. 19 जिल्ह्यातील 33 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 190 करोड रुपये कर्ज योगी सरकारने माफ केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. योगी सरकारचं शेतकऱ्यांनी कौतुक देखील केलं आहे.
2017 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कॅबिनेटमध्ये कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं कर्म माफ करण्यात आलं आहे. त्यावेळी ज्या शेतकऱ्यांची काही कारणामुळे कर्ज माफ झाली नव्हती. आता त्या 33 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट देण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे योगी सरकारने हा निर्णय घेतला होता. कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
तांत्रिक त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांचे कर्ज 2017 मध्ये माफ होऊ शकले नव्हते. त्यामुळे काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले होते. ज्यावेळी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं, त्यावेळी उच्च न्यायालयाने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश दिले होते. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्य यांनी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या इतर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Title – Farmers Loan Waiver : 33 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश – Loan waiver gift to 33 thousand farmers of UP, Yogi government issued order
